Monday, May 11, 2020

11 May - जीवनात टाळाटाळ करू नका

    

         जीवनात टाळाटाळ करू नका
             अथर्ववेदात सांगितलं आहे की, हृदयाची शक्ती आणि मनाचा संकल्प जेव्हा एखाद्या कामाला लागतात तेव्हा ते कार्य उत्तम रितीने संपन्न होत जाते. प्रत्येक व्यक्ती जसा घडवू पाहतो तसाच तो स्वत:ला घडवतो आणि त्याची सुरुवात मनात येणाऱ्या इच्छेने होते.मनाचे काम इच्छा उत्पन्न करणे आहे. जेव्हा मनात इच्छा उत्पन्न होते, कल्पनाशक्ती क्रियाशील होते आणि इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग शोधत राहते. जर मनाची इच्छा प्रबळ झाली तर काही क्षणानंतर तीच इच्छा अवचेतन मनाच्या कप्प्यात विलीन होऊन जाते. जर मनाची इच्छा बलवान असेल तर आपल्यात संकल्प शक्तीचा उदय होतो, जी वस्तुत: आपल्या आत्म्याची शक्ती आहे आणि त्यालाच आत्मशक्तीही संबोधले आहे. जेव्हा आपली आत्मशक्ती मजबूत होते, आपल्या इच्छा पूर्ण हेण्याची शक्यता वाढते. आत्मशक्तीच्या मार्गात सर्वात मोठा अडसर मनाची चंचलता आहे.

            कबीर म्हणतात, कबहुक मन गगनहि चढ़ै कबहु गिरै पाताल। कबहु मन अनमुनै लगै कबहु जाबै चाल। म्हणजे हे मन तल्लीन होऊन गगनात भरारी घेऊ लागते, अर्थात ते उत्साहाने भरलेले असते. तर कधी ते निराशेच्या गर्तेत सापडते. हेच मन कधीतरी ईश्वराच्या चिंतेत लीन होते कधी संसारिक विषयात भरकटत जाते. मन एकाच जागी तग धरून राहत नाही. यासाठी यशामध्ये संशय बळावतो. मनाला साधना आवश्यक आहे. मनाचे निराकरण आवश्यक आहे. मनाचे निराकरण करण्याचा संकल्प केला आहे. निराकरण करण्याचा कोणताही पर्याय नाही. जे ही आपल्या मनाने ठरविले आहे त्याला प्राप्त करण्याची योजना तयार करणे आणि ती पूर्ण करण्यासाठी तत्पर राहणे संकल्प शक्तीद्वारे शक्य नाही. जीवनाला परिवर्तित करण्याची क्षमता संकल्प शक्तीमध्ये आहे. संकल्प आपल्या मनात येणारे सकारात्मक विचार आहेत. संकल्प क्षीण होण्यात पहिली भूमिका आशंकेची असते.

         जीवन हे युद्धभूमीसमान आहे आणि जेव्हा कोणी आशंकाग्रस्त होतो, त्या क्षणी तो टाळाटाळ ग्रस्त होऊ लागतो. वास्तविकता ही टाळाटाळ निर्दोष वाटते, पण या सवयीच्या कारणामुळे आपण आपल्या क्षमतांना पूर्णपणे विकसित करत नाही. गोड विषासारखी टाळाटाळ करण्याची सवय आपल्या संकल्प शक्तीला क्षीण करते. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीत अर्जुनही टालाटाळ करायला लागला होता आणि युद्ध न करण्याची कारणे देऊ लागला होता. अशातच जगतगुरू श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की, हे पृथापुत्र! असं वागू नकोस हे तुला शोभत नाही. आपल्या मनातील क्षुद्र दुर्बलतेचा त्याग करून युद्धकरण्यासाठी सज्ज हो. संकल्प शक्ती प्रकट करण्यासाठी मनाच्या प्रबळ शक्तीच्या एकाग्रतेद्वारे दिशा देणे आवश्यक आहे. ज्यावेळा एकाग्रतेने आपण एखाद्या कार्याचे चिंतन करतो त्यावेळी परमेश्वराची शक्ती आपल्यासोबत कार्यरत असते.


        एकाग्रतेच्या या मार्गात सर्वात मोठी बाधा वैचारिकता आहे. वैचारिकता द्वैतामुळे उत्पन्न होते. हे मनाचे द्वंद्व आहे. मनाला स्थिर करण्यासाठी सूत्र म्हणजे प्रतिद्वंद्वाचा अवलंब करणे. असे केल्याने आपले मन निर्मळ होते आणि आपला स्वभाव अंतर्मुख होतो. जसे आपले दृष्टी बाहेरुन स्वतःकडे वळते त्यानंतर लक्ष्य सिद्धीचा मार्ग प्रशस्त होतो.

No comments:

Post a Comment

11 May - जीवनात टाळाटाळ करू नका

               जीवनात टाळाटाळ करू नका               अथर्ववेदात सांगितलं आहे की, हृदयाची शक्ती आणि मनाचा संकल्प जेव्हा एखाद्...