नमस्कार मित्रांनो
कसे आहात सगळे, आज जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा.
वर्षानुवर्ष आपल्याकडे मार्च महिना आला की होळी-धुळवडीचे वेध लागत. काळाच्या ओघात मार्चमध्ये खास बायकांच्या सणाची भर पडली, तो म्हणजे महिला दिन. तोही नुसता स्थानिक, धार्मिक सण नव्हे तर थेट जागतिक उत्सव. ८ मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन. तसे आपण सणसमारंभ साजरे करण्यात माहीर. त्यामुळे महिला दिनाचे पडघम महिला-सप्ताह, महिला-पंधरवडा वगैरेंपर्यंत घुमतात. व्याख्यानं, परिसंवाद, महिला मेळावे, नारीशक्तीचा जागर, नामवंत महिलांचे सत्कार, महिलाकेंद्री चित्रपटांचे महोत्सव, महिलांच्या वस्त्रालंकारांच्या खरेदीवर सवलती, खास महिलांसाठी सहली-सफरी असे एकेक आयाम वाढतच चालले. एकूण महिलांना खूष किंवा वश करण्याच्या नवनव्या क्लृप्त्या लोक शोधू लागले. तेवढ्या एका दिवसापुरत्या का होईना, आपण कोणी खास महत्त्वाच्या आहोत असं ज्यांना वाटलं त्या बायकाही ह्याने सुखावल्या. पण आता याची चाकोरी झाली आहे. पूर्वी दसरा-दिवाळीसारख्या सणांचं धार्मिक कर्मकांड असायचं तसं महिलादिनाचं सांस्कृतिक कर्मकांड रूढ व्हायला लागलंय. माध्यमसत्ता वाढेल तसतसं हे कर्मकांड वाढत राहील. आणखी आकर्षक 'मार्केटेबल' कल्पना निघतील.
कोणत्याही स्वरूपात का होईना, बायकांच्या सरासरी जगण्याकडे-मागण्यांकडे लक्ष वेधलं जाणं महत्त्वाचंच आहे. त्यामुळे उत्सवी स्वरूपाला मोडीत काढण्याची घाई करायला नको. पण बदलत्या काळाबरोबर त्याला अधिक अर्थपूर्णता मात्र आली पाहिजे. असं म्हणतात की ८ मार्च १९४३ रोजी भारतात, मुंबईमध्ये पहिला स्त्रीदिन साजरा झाला. १९७१च्या ८ मार्चला पुण्यात ह्या निमित्ताने पहिल्यांदा एक मोठा महिला मोर्चा निघाला. १९७४ ते ८४ हे स्त्रीमुक्ती दशक माझ्या प्रौढवयात, स्त्रीविषयक जाणिवा टोकदार होत असताना आलं. १९७५ हे वर्ष यूनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केलं आणि स्त्रीहितकारी विचाराला चौफेर चालना मिळाली. ह्या सगळ्याला दशकं ओलांडली, शतक बदललं त्यामुळे बदलत्या वास्तवामध्ये अनेक मुद्द्यांचा फेरविचार करावासा वाटतोय आता.
इतिहास सांगतो की ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगामधल्या हजारो स्त्रीकामगारांनी रूटगर्स चौकात जमून एकजुटीने निदर्शनं केली. त्यांची मागणी सर्व प्रौढ स्त्रियांना निरपवाद मतदानाचा हक्क मिळावा अशी होती. तसेच, न्यूयॉर्कमधल्या वस्त्रोद्योगामध्ये बायांना पुरुषांबरोबर 'समान काम - समान दाम' मिळावं आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळावी ह्यासाठी त्या रस्त्यावर उतरल्या होत्या. कौटुंबिक अन्यायाबद्दल हा लढा नव्हता. तसंच सवलतींची अपेक्षा नव्हती. ह्या लढ्याचं स्मरण ठेवण्यासाठी १९१० साली कोपनहेगनमध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून घोषित झाला. पुढे क्रमाक्रमाने १९१८ साली इंग्लंड, १९१९ साली अमेरिकेत महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. त्यामानाने भारतीय स्त्रिया भाग्यवान. स्वातंत्र्याबरोबरच त्यांना मतदानाचा हक्क मिळाला. पण हे राज्यकर्त्यांचं वैचारिक द्रष्टेपण घरादारात, समाजात नव्हतं, आजही तितकंसं नाही. त्यामुळे कुटुंबातली कुचंबणा, रूढी-परंपरांमधला अन्याय, बायकांच्या फुलण्याबहरण्यात नाना अडसर येतच राहिले आणि त्याला कारण असणाऱ्या पुरुषांचा, पुरुषसत्तेचा निषेध-द्वेष-विरोध करणं स्थिरावत गेलं. फारच उथळपणे याकडे बघणाऱ्यांनी ह्याला पुरुष विरुद्ध बायका अशा सामन्याचं स्वरूप दिलं. तर थोडं सामोपचाराने घेऊ बघणाऱ्यांनी पुरुषांना हरवणं, पुरुषांना मागे टाकून पुढे जाणं ही उद्दिष्ट बायकांपुढे ठेवायला सुरुवात केली. घरामध्ये कन्याजन्म झाला की बर्फीऐवजी पेढे वाटावेत, मुलीला मुलग्यासारखं वाढवण्यात फुशारकी मानावी, याची कौटुंबिक प्रदर्शनं अनेकांनी पाहिली असतील. पण सामाजिक पातळीवरही याचेच पडसाद उमटले. एसएससी किंवा एमपीएससीसारख्या परीक्षांमध्ये मुली मुलग्यांपेक्षा किती जास्त टक्क्यांनी पास झाल्या, किती पुढे गेल्या याचे आकडे सालोसाल जाहीर होतात. अमुक एका परीक्षेत ओळीने तीन वर्षं मुलगीच पहिली आली याची बातमी होते. मतदानातला स्त्रियांचा टक्का वरचेवर तपासला, उद्घोषला जातो. हे सर्व सर्वकाळ बाईच्या श्रेष्ठतेचं गमक किंवा कनिष्ठतेची ग्वाही असत नाही. बरेच व्यावहारिक मुद्देही असतात. सोयी-सवलती-दृष्टिकोन-कुटुंबाच्या जबाबदाऱ्या-बंदिस्तपणा-संधीचा अभाव-भीड-भीती अशा अनेक गोष्टी असतात. व्यक्तिसापेक्षता तर असतेच असते. बारकाव्याने बघणाऱ्याला ती कळते. ढोबळमानाने बघणाऱ्याला मात्र बायका पुरुषांच्या पुढे गेल्याचा भास होतो. जर अभ्यासक्रम एकच आहे, एकाच कालावधीत तो पूर्ण करून एकाच परीक्षेला एकाच प्रकारे बायकापुरुष सगळे सामोरे गेले आहेत तर हा लिंगविशिष्ट गौरव करून आपण काय साधतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे. समतेची थोडीफार पावलं टाकल्यावर आता तरी 'पुरुषांना हरवून जिंकणारी बाई' हा नमुना डोळ्यासमोर ठेवण्याची गरज नाही. सुरुवातीच्या भाबड्या कौतुकाला आता स्थान नको आणि नसती तेढ वाढवण्याची गरजही नाही.
आज समाजात बायकापुरुषांमधली तेढ अधूनमधून दिसते. बायकांच्या कर्तबगारीने, यशाने भयभीत झालेले पुरुष दिसतात. महिलांना सगळीकडे झुकतं माप मिळतंय, कायदे एकतर्फी त्यांच्या बाजूचे आहेत, बायकांना 'लाडवून' ठेवण्याकडे सत्तेचा कल आहे असं चुकीनं मानणारे आणि पसरवणारे लोक वाढताहेत. ही परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली की बायकांचं चारित्र्यहनन करणं, शारीरिक बळजबरी करणं, चारित्र्यावर कलंक लावणं असे मार्गही काही जण चोखाळताहेत. ह्या सगळ्याला तर्कशुद्ध उत्तरं देण्याएवढा वेळ आणि शक्ती अनेक बायकांकडे नाहीये आणि त्या बळी जाताहेत. स्त्रीपुरुषांना स्पर्धक बनवण्यापेक्षा परस्परपूरक बनवणं, एकमेकांमधलं चांगलं तेवढं घेऊन अधिक दर्जेदार आयुष्य मिळवायला तयार करणं हे यापुढच्या महिलादिनांचं उद्दिष्ट हवं.
महिलादिनाची सुरुवात करताना महिलांनी एकत्र येणं, संघटित प्रयत्न करणं याला दाद देण्याचा प्रयत्न होता. पण आज अनेक बायका व्यक्तिगत जगण्यात, घरातली आणि बाहेरची आव्हानं पेलण्यात इतक्या गढल्यात की त्यांना संघटित व्हायला वेळच नाही. त्यामुळे एखाद्या सामायिक उद्दिष्टासाठी एक होणं, त्या त्या गटाशी एकरूप होणं, त्याच्यात 'मी'पण विलीन करणं तितकंसं होत नाही. रंग-रूप-बुद्धी-पैसा-कौटुंबिक पार्श्वभूमी-सामाजिक स्तर-अर्थार्जनाची कुवत-सत्ता अशा अनेक बाबतीत बायका आपापसातच स्पर्धा करताना दिसतात. वास्तविक ह्यातल्या बऱ्याच गोष्टी तात्कालिक असतात. बाई म्हणून असणारी सुखदुःखं, आव्हानं, अपेक्षा ह्यापेक्षा जास्त टिकाऊ आणि दखलपात्र असतात. त्यासंदर्भात एकमेकींविषयी किमान आस्था, आदर, सहानुभूती हवी. पण तसं पुरेसं होत नाही. 'बाईच बाईची शत्रू' हे भोंगळ विधान सोडलं तरी 'बाईच बाईची खरी मैत्रीण' बनल्याचं सकारात्मक चित्र कमीच दिसतं. भावनिक आंदोलनात समंजस साथ देणं, कुठे चुकतंय असं वाटलं तर विश्वासाने ते सांगता व ऐकता येणं, संकटग्रस्त बाईच्या मागे उभं राहणं ह्या अर्थाचं मैत्र बायकांना एकमेकीत सापडलं तरी बराच ताण हलका होईल.
तसंच स्त्रीदिनाबद्दलही व्हावं. बदलत्या आयामांसोबत जाण्याच्या दृष्टीने अशा निमित्तांनी बायकापुरुषांमधली तेढ मिटवणं आणि बायकाबायकांमधला मैत्रभाव वाढवणं ह्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. नेमेचि येणाऱ्या महिलादिनाची वाटचाल ह्या दिशेने झाली तर ते कालसुसंगत होईल आणि त्याचं चीज होईल. तेव्हाच कदाचित शांताबाई शेळक्यांचे शब्द किंचितसे बदलून बायकांच्या तोंडी येईल.
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•

English Translation
Hello friends
How are you all, today is International Women's Day
Good luck.
Year after year, we have the month of March and we are observing Holi-Dhulwadi. In the course of time, a special women's festival was added in March, which is Women's Day. It is not just a local, religious festival but a direct global celebration. March 8: International Women's Day. By the way you specialize in celebrating festivals. Therefore, the rhythm of Women's Day revolves around Women's Week, Women's Fortnight, etc. Lectures, seminars, women's gatherings, awakening of women's power, felicitation of eminent women, festival of women-centric films, discounts on purchase of women's costumes, excursions for special women were on the rise. People began to find new ways to please or subdue all women. Why didn't it happen for so many days, it made even the women who thought they were very important were happy. But now it's over. In the past, festivals like Dussehra and Diwali used to be religious rituals, but women's day cultural rituals have become commonplace. This ritual will continue to grow as the media grows. More attractive 'marketable' ideas will come out.
In any case, it is important to pay attention to the average life expectancy of women. So don't rush to break the festive look. But over time, that is likely to change. It is said that on March 8, 1943, the first Women's Day was celebrated in Mumbai, India. On March 8, 1971, a large women's march was organized for the first time in Pune on this occasion. The decade of women's emancipation from 1974 to 1984 came in my adulthood, when feminist awareness was sharpening. The year 1975 was declared by UNO as the 'World Year of Women' and the cause of women's welfare was given a boost. Decades have passed, centuries have passed, so in the changing reality, many issues need to be reconsidered now.
History tells us that on March 8, 1908, thousands of women workers in New York's textile industry rallied in Rutgers Square. His demand was that all adult women should have the right to vote without exception. Also, in the textile industry in New York, women took to the streets with men to get 'equal work - equal pay' and safety in the workplace. This was not a fight for family injustice. Also, no concessions were expected. To commemorate this struggle, March 8 was declared International Women's Day in 1910 at the Second International Socialist Women's Conference in Copenhagen. Later in 1918 in England and in 1919 in the United States, women got the right to vote. Indian women are lucky. With independence, they got the right to vote. But the ideological vision of the rulers was not in the house, in the society, not even today. As a result, the family feud, injustice in the traditions, various obstacles in the flowering of women kept coming and the opposition of the men, the masculinity, which was the cause of it, became stable. Those who looked at it very shallowly described it as a match between men and women. So those who tried to get a little bit of sympathy started to set the goal of defeating men, leaving men behind and moving on. Many may have seen the family demonstrations that if a girl is born at home, she should feel like a tree instead of snow, and should be proud of raising a girl like a boy. But it also had repercussions at the societal level. In the exams like SSC or MPSC, the figures of girls passing more than boys, how far they have gone, are released year after year. In one of the exams, it was reported that only a three-year-old girl came first in a row. The percentage of women in the polls is mostly checked and announced. All this is not always a sign of a woman's superiority or inferiority. There are also many practical issues. Convenience-Concessions-Attitudes-Family Responsibilities-Confinement-Lack of Opportunity-Crowd-Fear Personality is always there. Anyone who looks closely knows it. Roughly speaking, it seems that women are ahead of men. If the curriculum is the same, all the men and women have faced the same exam in the same period by completing it in the same period, then it is time to think about what we achieve with this gender distinction. After taking a few steps towards equality, there is no need to keep in mind the pattern of 'woman who wins by defeating men'. The initial bhabda appreciation no longer needs a place and there is no need to widen the gap.
In today's society, the gap between men and women is seen from time to time. Men appear to be terrified of their wives' accomplishments. Everywhere women are being measured, laws are one-sided, there is a growing tendency for people to err on the side of authority and to spread the idea of 'pampering' women. This situation has gone so far out of control that some people are resorting to such methods as degrading the character of women, forcing them physically, and tarnishing their character. Many women do not have the time and energy to give logical answers to all this and they fall victim. The aim of the next Women's Day should be to make men and women complementary rather than competitive, to make them get a better quality of life by taking the best of each other.
At the beginning of Women's Day, it was an attempt to appreciate the women coming together and making a concerted effort. But today many women are so engrossed in personal life, at home and abroad that they do not have time to unite. Therefore, uniting for a common cause, uniting with that group, merging the 'I' into it is not so much. In many respects, women are seen competing with each other in terms of appearance, intellect, money, family background, social status and the power of earning. In fact, many of these things are temporary. The joys and sorrows of being a woman are more enduring and noticeable than the challenges, the expectations. It requires a minimum of faith, respect and empathy for each other. But that is not enough. Even if the statement 'Baich Baichi Shatru' is dropped, the positive picture of 'Baich Baichi's true friend' is less visible. Even if you find a friend in each other's sense of meaningful support in an emotional movement, if you feel that something is wrong, you can say and listen to it with faith, standing behind a troubled woman, even if you find a friend in each other.
It should also be about Women's Day. In order to keep pace with the changing dimensions, efforts should be made to bridge the gap between men and women and to increase the friendship between women and men. If the regular Women's Day goes in this direction, it will be timely and it will become a thing. Only then will the words of Shantabai Shelakya change slightly and come to the lips of women.

No comments:
Post a Comment